Read Essential Course Information

1. श्रवणबाधितांसाठी भाषा अध्यापनाची तत्वे, पद्धती, तंत्रे

 

भाषा ही निसर्गाने मानवास दिलेली एक अमुल्य देणगी आहे. या भाषेच्या माध्यमातून आपण समाजातील सर्व सजीवांशी संवाद साधू शकतो. भाषा आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मानवात नैसर्गिक शक्ती निसर्गाने मानवाला प्रदान केली आहे. त्याला language Aquisition Device किंवा 'Innate Language Capacity' असे म्हंटले जाते. ह्याबरोबरच मानवास जन्मापासून आजूबाजूच्या परिसरातून समाजातून भाषेचे ज्ञान मिळत असते. हे ज्ञान श्रवणाच्या संवेदनेतून प्रत्येक मुल आत्मसात करीत असते. आणि ऐकत ऐकत आपली भाषा विकसित होत जाते. म्हणजेच भाषा आत्मसात करण्यासाठी श्रवण ही सर्वात महत्वाची संवेदना आहे. ही संवेदना नसेल अथवा दोषपूर्ण असेल तर भाषा आपोआप आत्मसात केली जाऊ शकत नाही तर त्यासाठी विविध प्रयत्न करून ही भाषा शिकवावी लागते. 

        या संपूर्ण अभ्यासक्रमात  आपण श्रवणबाधित मुलांचा भाषा विकास करताना कोणकोणत्या तत्वांचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच ह्या तत्वांचा योग्य उपयोग करण्यासाठी विविध भाषा अध्यापन पद्धती आणि तंत्रे कोणती आहेत ते बघणार आहोत.